अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, हल्लेखोर ठार… (पहा संपूर्ण व्हिडीओ)

 

जळगाव समाचार डेस्क;

अमेरिकेत (America) राष्ट्राध्यक्षपदाच्या (Presidential Election) निवडणुकीपूर्वी हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या रॅलीमध्ये गोळीबार झाला आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी तत्काळ स्टेजवरून बाहेर काढले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प गोळ्या झाडल्यानंतर व्यासपीठावर लोटांगण घालताना दिसत आहेत. यानंतर सीक्रेट सर्व्हिस (त्यांचे सुरक्षा रक्षक) त्यांना घेरतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे. माजी राष्ट्रपती सुरक्षित असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या आहेत, तपास सुरू आहे. बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी सांगितले की, संशयित बंदुकधारी व्यक्तीला गोळी घालून ठार केले गेले आहे.
‘माझ्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली’
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, आपल्या देशात असे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही, जो आता मरण पावला आहे. मला गोळी लागली होती जी माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली होती. काहीतरी गडबड आहे हे मला लगेच कळले कारण मी मोठा आवाज ऐकला, गोळ्या झाडल्या गेल्या आणि लगेच गोळी त्वचेतून गेल्याचे जाणवले.
‘लोकशाहीत राजकीय हिंसेला स्थान नाही’
रॅलीत झालेल्या गोळीबाराबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट केले की, आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाही. मात्र, नेमके काय झाले, हे अद्याप आम्हाला समजलेले नाही, पण माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर दुखापत झाली नाही, याबद्दल आपण सर्वांना दिलासा वाटला पाहिजे. मिशेल आणि मी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.

काय म्हणाल्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी ट्विट केले की, “मला माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पेनसिल्व्हेनियातील कार्यक्रमात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. डग आणि चिंतीत होते, मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली नाही हे ऐकून बरे वाटले. आम्ही त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि या मूर्खपणाच्या गोळीबारात जखमी झालेल्या आणि प्रभावित झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक प्राधिकरणांच्या त्वरित कारवाईबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आपल्या देशात अशा प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही. आपण सर्वांनी या घृणास्पद कृत्याचा निषेध केला पाहिजे.

गोळीबाराचा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here