जळगाव समाचार | ११ सप्टेंबर २०२५
जळगाव शहरातील चित्रा चौक ते शिवाजी महाराज पुतळा, भास्कर मार्केट रोड, गोविंदा स्टॉप आणि काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरात आज महानगर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात आली.
या कारवाईत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या १७ गाड्या, तीन छत्र्या, आठ कॅरेट आणि दोन गाड्या नाशवंत माल जप्त करण्यात आला. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि पादचारी मार्ग मोकळे करणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्पष्ट केले.