सुसरी येथे युवकाची आत्महत्या

0
32

वरणगावः येथुन जवळच असलेल्या सुसरी येथील कैलास पांडुरंग पाटील (वय ३७) याने दुपारी दोन वाजेचे पुर्वी नक्की वेळ माहीत नाही पिंपळगाव खु।. शिवारातील आसरामाता मंदीर परीसराचे जंगलात आजारास कंटाळून गळफास घेतल्याची घटना शनिवार रोजी घडल्याने वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, कैलास पांडुरंग पाटील राहणार सुसरी तालुका भुसावळ आजारास कंटाळुन सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. रविंद्र बळीराम पाटील यांचे खबरी वरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शना खाली तपास

पोहेकॉ श्रावण जवरे, प्रेमचंद सपकाळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here