मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीनी केले औक्षण तर तरुण उतरले प्रचारात
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील सिविल हॉस्पिटल, दिक्षित वाडी, वानखेडे सोसायटी, तुकाराम वाडी, कासमवाडी, लाठी शाळा परिसर, रचना कॉलनी, मासूमवाडी, जोशी कॉलनी, कंजरवाडा, नाथ वाडा , सिंधी कॉलनी या परिसरातील नागरिकांनी डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांचे जंगी स्वागत करीत निवडणूक साथ देण्याची हमी दिली आहे. या परिसरातील लाडक्या बहिणीनी मोठ्या संख्येत एकत्र येत डॉ.सोनवणे यांचे औक्षण करीत विजयी होण्याचा आशीर्वाद दिले आहे. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे याना अनेक समस्या देखील बोलून दाखविल्या. तर यावेळी जनतेने विजयाचे आश्वासन दिल्याने डॉ.अश्विन सोनवणे भारवून गेले होते. परिसरातील मित्रांकडून फटाक्यांची आतिषबाजी करीत डॉ. सोनवणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
ज्येष्ठांनी दिले आशीर्वाद
शहरातील अनेक परिसरात डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांचा प्रचार दौरा सुरू असताना अनेक परिसरातून ज्येष्ठ नागरिक यांनी डॉ. सोनवणे यांना आशीर्वाद देत विजयाची हमी देखील दिली आहे. मोठ्या जल्लोषात डॉ.अश्विन सोनवणे यांची प्रचार रॅली उत्साहात पार पडली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे,शैलेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, अमोल पांचाळ,कल्पेश कुमावत,पवन जोशी,जयेश जोशी, जितेंद्र ओतारी,कुलदीप राजपूत,कुंदन,ओतारी, सागर जोशी, अनंत जोशी, विजय जोशी, जयंत गोंधळी, निखिल जोशी, मनीष कानडे, रोहित जोशी,निलेश जोशी,वैभव कानडे,स्वप्नील जोशी,रोहन बोरसे,सागर जोशी, तुषार लागवडकर, सागर जोशी विशाल जोशी आशिष,सचिन कानडे,अनुप जोशी, पुष्पेन्द्र जोशी, विशाल जोशी, भूषण शिंदे, मानस भोजने, यश दोरकर, दिलीप श्रीखंडे, दीपक जोशी, पियूष जोशी, मोहित जोशी, उमेश दोरकर, गजानन ठाकरे यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थिती होते.