Monday, December 23, 2024
Homeक्राईमधक्कादायक; आसोद्यात महिलेला छेडल्याचा संशय, मारहाणीत प्रौढाचा मृत्यू...

धक्कादायक; आसोद्यात महिलेला छेडल्याचा संशय, मारहाणीत प्रौढाचा मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव तालुक्यातील आसोद्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. (Shocking News) आज दि. 4 जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावात एका ४३ वर्षीय व्यक्तीने महिलेची छेड काढल्याच्या संशयावरून प्रौढाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटनाघडली आहे.या घटनेत भास्कर दगडू भंगाळे (४३) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर जळगाव तालुका पोलीस गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (Mob Lynch)
याबाबत प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव पासून नजीकच असलेल्या आसोदा येथे भास्कर भंगाळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. दरम्यान गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते आसोदा गावातील गोकुळ नगर येथे गेले होते. यावेळी त्यांनी मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी त्यांना विचारणा केली. यानंतर काहींनी कसलीही तमा न बाळगता त्यांना थेट मारहाण करायला सुरुवात केली.
या मारहाणीत भास्कर भंगाळे यांना गंभीर इजा होऊन ते जबर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विन देवचे यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या घटनेबाबत आसोदा गावामध्ये खळबळ उडाली असून तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page