जळगाव समाचार | १३ जानेवारी २०२५
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून सर्वच उमेदवारांकडून अंतिम टप्प्यात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ ‘ड’ मध्ये युवा नेतृत्व अश्विन सुरेश भोळे यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांशी थेट संवाद, घराघरांत पोहोचणारी उपस्थिती आणि मुद्देसूद मांडणीमुळे त्यांच्या प्रचाराला विशेष गती मिळाली आहे.
अश्विन भोळे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारे, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले युवक म्हणून प्रभागात ओळखले जातात. विकासाच्या प्रत्येक मुद्द्याकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांना भावत असून युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचाही त्यांना सक्रिय पाठिंबा लाभत आहे. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत त्यांनी मांडलेल्या ठोस संकल्पनांमुळे प्रभागातील मतदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे कोणतेही पद नसतानाही अश्विन भोळे यांनी यापूर्वी प्रभागातील अनेक नागरी समस्या प्रशासनाकडे पाठपुरावा करून मार्गी लावल्या आहेत. हाच अनुभव आणि जनसेवेची तळमळ घेऊन त्यांनी यंदा थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरून पूर्णवेळ सेवा देण्याचा निर्धार केला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले हे युवा नेतृत्व नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत असल्याचे चित्र सध्या प्रभाग ५ ‘ड’ मध्ये दिसून येत आहे.

![]()




