चाळीसगाव -भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगावमध्ये घडली.
या अपघातात संजना जाधव आणि गाडीचा चालक हा थोडक्यात बचावला आहे. एका पिकअप गाडीने समोरुन संजना जाधव यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे ही अपघाताची घटना घडली. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीदेखील बचावासाठी धाव घेतली. यावेळी गाडीतील संजना जाधव आणि त्यांच्या गाडीचा चालक सुखरुप असल्याची माहिती समोर आली. तसेच संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती आहे.