अंगावर वीज पडून जवानाचा मृत्यू ; अंतुर्ली येथील घटना

पाचोरा ;- बिहार येथून सुट्टीवर आलेल्या जवानाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ९ रोजी सायंकाळी पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खडकी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे भूषण आनंदा बोरसे वय 33 असे मयत जवानाचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यात काल अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले होते. अंतुरली येथील रहिवासी असलेले भूषण आनंदा बोरसे हे सशस्त्र सीमा बलात बिहार येथे कार्यरत होते. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सुट्टीवर आले असता आई-वडिलांना शेतात मदत व्हावी म्हणून शेतात गेले असता तिथून आपल्या दुचाकीने परत येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक कळा पसरली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here