अमित काळे यांची प्रभागात प्रचाराची सुरुवात

 

जळगाव समाचार | दि. ४ जानेवारी २०२५

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. आज सायंकाळी पिंप्राळा परिसरातून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असला, तरी उमेदवारांनी आपल्या प्रभागांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला आज सकाळपासूनच प्रारंभ केला आहे.

प्रभाग क्रमांक ६ ‘क’ मधील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक व यंदाचे अधिकृत उमेदवार अमित पांडुरंग काळे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली. यावेळी त्यांनी घराघरांत भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच आगामी विकास आराखड्याविषयी संवाद साधला.

त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक ६ ‘अ’ मधील भाजप पुरस्कृत उमेदवार जयश्री धांडे, प्रभाग ६ ‘ब’ मधील उमेदवार शुचिता हाडा तसेच प्रभाग ६ ‘ड’ मधील उमेदवार रूपेंद्र सूर्यवंशी यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here