जळगाव समाचार | दि. १३ जानेवारी २०२५
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी अधिकृतपणे शांत होणार आहे. अशा निर्णायक टप्प्यावर प्रभाग क्रमांक ६ क मधील उमेदवार अमित काळे यांनी प्रभावी आणि लोकाभिमुख प्रचारातून मतदारांमध्ये भक्कम विश्वास निर्माण केला आहे.
अमित काळे यांनी संपूर्ण प्रचारकाळात प्रभागातील गल्लीबोळांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणी त्यांनी बारकाईने ऐकून घेतल्या. निवडून आल्यास प्रभागातील मूलभूत सुविधा प्राधान्याने सोडविण्याचा ठाम शब्द त्यांनी दिला.
त्यांचा साधा, संयमी आणि कामावर विश्वास ठेवणारा स्वभाव नागरिकांना भावला असून प्रचारादरम्यान नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठींबा मिळत आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा आहे,” असे सांगत काळे यांनी विकासात्मक राजकारणावर भर दिला.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही अमित काळे यांनी जनतेशी संपर्क कायम ठेवत मतदारांचा विश्वास अधिक दृढ केला असून प्रभागात त्यांच्या प्रचाराला स्पष्ट आघाडी मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

![]()




