जळगाव समाचार | 9 मे 2025
भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव अधिक तीव्र झाला असताना, अमेरिकेने भारताला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. “दहशतवाद्यांविरोधात आम्ही भारतासोबत आहोत आणि कोणत्याही कृतीला योग्य उत्तर दिलं जाईल,” अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने पाकिस्तानला देखील युद्ध न करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
काल सकाळी पाकिस्तानकडून भारताच्या सीमेला लागून असलेल्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताच्या डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानच्या आठ मिसाईल्स आणि अनेक ड्रोन हवेतच पाडले.
पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर या तीन राज्यांतील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. जम्मूतील विद्यापीठ आणि विमानतळ हे पाकिस्तानच्या रडारवर होते, मात्र भारताने तो हल्ला अचूकपणे परतवून लावला.
लाहोरवर भारताचा प्रत्युत्तरात्मक हल्ला
पाकिस्तानच्या या कारवाईनंतर भारताने लाहोरवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ला केला. लाहोरमधील लष्करी तळ आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर लक्ष्य साधण्यात आले आहे.
भारत-अमेरिका चर्चा
पाकिस्तानच्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर भारताने अमेरिकेशी उच्चस्तरीय चर्चा केली. अमेरिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, भारताच्या सुरक्षेसाठी आणि दहशतवादविरोधी लढ्यासाठी आम्ही भारतासोबत आहोत.