जळगाव समाचार डेस्क| ५ ऑगस्ट २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली असून त्यासाठी सर्व पक्षांची युद्धपातळीवर उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी अगदी गल्लीतील कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेत्यांमध्ये धावपळ दिसून येत आहे. त्यात उमेदवारी मिळावी म्हणून अनेक हौशींच्या पक्षातील ज्येष्ठांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. अश्यातच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातून मोठी बातमी समोर आली आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगत राजकीय निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी आपला पुतण्या जयसिंह सोळंके यांना राजकीय वारसदार असल्याची घोषणा केली.
आपल्या मतदार संघात एका गावात बोलतांना त्यांनी हि मोय्ही घोषणा केली. त्यांनी आपले लहान भाऊ धैर्यशील सोळंके यांचे चिरंजीव जयसिंह सोळंके यांना आपला राजकीय वारस म्हणून जाहीर केले. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं.