Sunday, December 22, 2024
HomeUncategorizedरिल्स बनविण्याच्या नादात तरुणाचे शिर झाले धडावेगळे

रिल्स बनविण्याच्या नादात तरुणाचे शिर झाले धडावेगळे

आग्रा वृत्तसंस्था  रील बनवणाऱ्या तरुणाचे शिर त्याच्या शरीरापासून वेगळं झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रील बनवताना तरुण स्लो मोशनमध्ये एका गाण्यावर डान्स करत होता.यावेळी त्याने खाली लावण्यात आलेली लोखंडी जाळी उचलली आणि त्याचवेळी तोल जाऊन तो खाली पडला. तरुण खाली पडल्यानंतर ती जाळी त्याच्या डोक्यावर आदळली. यावेळी त्याचं मुंडकं वेगळं झालं. गळाच कापला गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ फक्त 35 सेकंदाचा आहे. व्हिडीओत एकूण 5 तरुण दिसत आहेत. यामधील दोन तरुण खाली बसलेले आहेत. दुसरा तरुण शटर उघडण्याची तयारी करत असून, एकजण मागे उभा असतो. यावेळी एक तरुण तिथे स्लो मोशनमध्ये डान्स करत असतो.

तोल गेल्याने खाली पडला

व्हिडीओ पाहिल्यानंतर तरुण रील बनवत असल्याचं वाटत आहे. तो स्लो मोशनमध्ये डान्स करत असतो. त्याच्या मनात अचानक काय येतं माहिती नाही, पण तो खाली लावण्यात आलेली लोखंडाची जाळी उचलतो. पण ती उचलताच त्याचा तोल जातो आणि पाय घसरुन खाली पडतो. यावेळी तिथे उपस्थित सर्वजण त्याच्या दिशेने धाव घेतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. तरुणाचं जाळीत अडकल्याने डोकं शरीरापासून वेगळं होतं. तरुण चौथ्या माळ्यावरुन खालच्या माळ्यावर जाऊन कोसळतो. या दुर्घटनेनंतर तिसऱ्या माळ्यावर रक्ताचा सडा दिसत होता. घटनेची माहिती मिळतात तिथे सर्वांनी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page