जळगाव समाचार डेस्क;
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऍड. कुणाल बी पवार यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्राध्यापक भरतीतील विहित करण्यात आलेली बिंदू नामावली सुधारणा करून भरती करण्याबाबत कुलगुरूंना ईमेल द्वारे पत्र लिहून पाठवले आहे. (Jalgaon)
ऍड. कुणाल बी पवार यांनी कुलगुरू यांना शासन निर्णय क्रमांक बीसीसी 2021 प्र क्र 75/16 क… शासन निर्णय सामान्य प्रश्न विभाग बीसीसी प्र क्र 387/16 ब (ए ) दि. 6/7/2021 देत सांगितले आहे कि, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी भारतीय घटनेच्या कलम 15(4),15(5),16(4),46 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (एस ई बी सि )(socially and educationally backward classes ) अशा नवीन वर्ग तयार झाला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम 5(1 ) अन्वय सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग राज्याच्या अखत्यारीतील लोकसेवा मधील शासकीय व निम शासकीय सेवेत सरळंसेवा भरतीच्या पदामध्ये दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. होऊ घातलेल्या विद्यापीठ जाहिरात क्रमांक सात ऑब्लिक 23 सहाय्यक प्राध्यापक भरती ही 12 वर्षांनी होत आहे तरी मराठा समाजाच्या पात्र उमेदवाराला अन्याय न होऊ देता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र बी सी 2021 प्र क 387/16 ब (ए ) दि 6/7/2021 च्या अन्वये विहित करण्यात आलेली बिंदू नामावली सुधारणा करून भरती करण्याची यावी याचिका या पत्राद्वारे आपणास सादर करीत आहे…….
सोबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रश्न विभाग शासन क्रमांक बीसीसी 21 प्रक 75 16 क मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई तारीख 27 फेब्रुवारी 2024 जीआर पाठवत आहे…