जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणारा आरोपी अटकेत…

 

जळगाव समाचार डेस्क| ३० ऑगस्ट २०२४

 

जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा (३५) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जाबीर शहा हा आपल्या साथीदारांसह मोटारसायकल चोरी करून कमी किमतीत विकत असल्याचे उघड झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील आणि दिपक चौधरी यांचे पथक वरणगाव येथील तिरंगा चौकात कारवाई करत जाबीर शहा याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, जाबीर शहा याच्या ताब्यातून हिरो कंपनीची HF डिलक्स (MH19DJ7412), होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा (MH28AX1141), रॉयल इनफिल्ड बुलेट (MP68MG9638), आणि होन्डा युनिकॉर्न (MH12QB0327) या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या चार मोटारसायकलींची एकूण किंमत १.५५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here