इंदोरजवळ अपघात; सूरज झंवरसह तिघे जखमी…

जळगाव समाचार | २६ फेब्रुवारी २०२५

जळगावचे व्यावसायिक सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झंवर आणि त्याचे दोन मित्र इंदोरजवळील मानपूर येथे अपघातात जखमी झाले. रात्री १ वाजता समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात चालक शरद गंभीर जखमी झाला असून सूरज झंवर, पलाश तोतला आणि आलोक शिवानी हेही जखमी झाले आहेत.

सूरज झंवर आजोबांच्या अस्थी विसर्जनासाठी हरिद्वारला गेला होता. विधी आटोपून दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर राजधानी एक्सप्रेस चुकल्याने त्यांनी विमानाने इंदोर गाठले. तिथून जळगावला जात असताना मानपूरजवळ हा अपघात झाला.

अपघातानंतर काही वेळ जखमी मदतीसाठी वाट पाहत होते. जळगावकडे परतणाऱ्या तरुणनांनी जळगाव पॅसिंगची गाडी पाहून लागलीच मदतीसाठी आपली गाडी थांबवली. दत्तू कोळी व दिनेश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात चालक शरद गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर सूरज झंवर, पलाश तोतला आणि आलोक शिवानी यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अपघाताची माहिती मिळताच जळगावमधील नातेवाईक इंदोरला रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here