जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात, ३ तरुण ठार, ३ जखमी

जळगाव समाचार डेस्क | २० डिसेंबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील सावदा-रावेर मार्गावर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता झालेल्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू झाला, तर ३ अन्य गंभीर जखमी झाले. हे तरुण भुसावळ येथील हळदीचा कार्यक्रम संपवून घरी परतत होते.

सावदा गावाजवळ गाडी (एमएच 20 सीएस 8002) झाडाला धडकली. या गाडीला जोरदार धक्का लागला आणि ती चेंदामेंदा झाली. शुभम सोनार, मुकेश रायपूरकर आणि जयेश सोनार हे तीन तरुण मृत्यूमुखी पडले, तर गणेश भोई, अक्षय उन्हाळे आणि विकी जाधव हे जखमी झाले.

दुखःद संयोग:
मुकेश रायपूरकर यांचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याने परिवारात शोक व्यक्त केला जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे रावेर शहरात शोककळा पसरली आहे. ३ कुटुंबांना एकाच वेळी मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here