जळगाव समाचार डेस्क| १५ ऑगस्ट २०२४
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ वर सकाळी ११.४५ वाजता हा भयंकर अपघात घडला. उभ्या ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४५ वर्षीय वडील आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला. एका ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रक चालकाने महामार्गाच्या कडेला ट्रक उभा केला होता. याच दरम्यान, मागून आलेल्या भरधाव कारने या ट्रकला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णतः चिरडला गेला आणि कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ४५ वर्षीय वडील आणि त्यांचा ७ वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे.
या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. जखमींना तातडीने घटनास्थळावरून वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या कारचे अक्षरशः चक्काचूर झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचा पुढील भाग कापून त्यातून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. सध्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून, ट्रक आणि कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
महामार्गावरील अपघातांची मालिका चिंताजनक
समृद्धी महामार्गावर घडलेल्या या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या महामार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून, वाहनचालकांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. पोलिसांनी वाहनचालकांना महामार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादा पाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

![]()




