कालिंका माता मंदिराजवळ अपघातात ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी डंपरला आग लावली…

 

जळगाव समाचार डेस्क | २५ डिसेंबर २०२४

जळगाव शहरातील कालिंका माता चौकात बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. योजस धीरज बऱ्हाटे असं मयत झालेल्या मुलाचं नाव आहे. तो अयोध्या नगर येथील लीला पार्क परिसरात आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी योजस आणि त्याची बहिण भक्ती (वय १३) त्यांच्या मामा योगेश बेंडाळे यांच्यासोबत दुचाकीवर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी एका डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये योजस जागीच ठार झाला, तर भक्ती आणि मामा जखमी झाले.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपरला आग लावली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाठीचार्ज केला.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी आणि आमदार राजूमामा भोळे आदि उपस्थित आहेत. जमवाला शांत करण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा याठिकाणी हजर आहे, परंतु जमाव शांत होण्यास तयार नव्हता. पोलिसांनी डंपरचालकाला ताब्यात घेतले आहे, आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here