जळगाव समाचार डेस्क;
शहरातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात काल रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीत दुचाकी समोर अचानक कार आल्याने झालेल्या अपघातात ४४ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नीलेश केशव बारी असे मयताचे नाव आहे. (Jalgaon)
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शास्त्रीनगरातील रहिवासी नीलेश केशव बारी (४४) हे शेतिचे काम करून शनिवारी रात्री सागर पार्ककडून दुचाकीने घराकडे जात होते. दरम्यान अचानक समोर आलेल्या कारसोबत ते धडकले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचे बरेच रक्त वाहिले, व ते त्याच अवस्थेत पडून होते. दरम्यान एका तरुणाने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांना डॉ. अमोल पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. रुग्णालयात त्यांचे वडील व पत्नीने मृतदेह पाहताच प्रचंड आक्रोश केला. हे दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.