जळगाव समाचार डेस्क
कामावरून घरी परत जाणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाला बसणे धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लोन जवळ घडली या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदू चव्हाण असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते मेहरुण तलाव परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते कामावरुन घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, रस्ता ओलांडत असतांना जळगाव आगाराची (एमएच २०, बीएल ११९७) क्रमांकाची बस पाचोऱ्याकडे जात होती. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या सदू चव्हाण या वृद्धाला जोरदार धडक दिली. या अपघातात सदू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. . पोलिसांनी घटनास्थळाहून धडक देणारी बस सह चालकाला ताब्यात घेतले.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, योगेश बारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. स्नेहल दुग्गड यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

![]()




