जळगाव समाचार डेस्क;
१७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एक टँकर दुचाकीच्या अपघातात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मयताचे आई-वडील व बहिण हे जखमी झाले आहे. पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर हा अपघात झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दि.आमडदे ता. भडगाव येथील रहिवासी असलेले नरेंद्र भोसले हे दि. १७ जून रोजी पाचोरा येथे पत्नी, मुलगा आणि मुली सोबत कामानिमित्त आलेले होते. काम संपवून ते रात्री घराच्या दिशेने आमडदे येथे जात होते. मात्र बांबरुड फाट्याजवळ होत्याच नव्हत झालं. त्यांच्या गाडीला अपघात होऊन मुलगा राजवीर नरेंद्र भोसले (१५) रा. आमडदे ता. भडगाव याचा आई-वडील आणि बहिणीच्या समोर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने आमडदे गावात शोककळा पसरली आहे.