जळगाव समाचार डेस्क;
चाळीसगाव तालुक्यातील लाकूड वाहतुकीचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तीकडून सागवान लाकड्याच्या वाहतुकीच्या परवान्यासाठी तीन हजाराची लाच घेताना धुळे वनविभागातील लेखपाल ला लाचलुचपत विभागाने गुरूवारी दि.११ रोजी रंगेहाथ अटक केली आहे. किरण गरीबदास अहिरे असे लेखापालचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील तकारदार रहिवाशी आहेत. त्यांचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी धुळे तालुक्यातील मौजे गरताड येथील शेतकऱ्याच्या शेतातील सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. त्यासाठी गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकूड वाहतुकीची परवानगी मिळण्यासाठी २१ फेबुवारी २०२४ ते २३. फेबुवारी २०२४ दरम्यान वन क्षेत्रपाल, धुळे (ग्रामीण) यांच्याकडे अर्ज केला होता. दरम्यान तक्रारदार परवानगी मिळण्यासाठी पाठप्रवा करण्यासाठी धुळे येथील उप वनसंरक्षक कार्यालयात जात होते. त्यावेळी कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी त्यांचेकडे संबंधित काम करून देण्यासाठी ३ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यांनतर लाचलुचपतने सापळा रचून दि. ११ गुरूवारी रोजी लेखापाल किरण अहिरे यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात पकडले.