जिल्ह्यात लाचलुचपत विभागाची गटविकास अधिकारी व चार कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई…

जळगाव समाचार डेस्क| २४ ऑक्टोबर २०२४

पारोळा तालुक्यातील सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे बिल मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. २३) या प्रकरणात पाचही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने सावखेडे तुर्क ग्रामपंचायत येथे विकासकामांचा ठेका घेतला होता. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी व इतर कामांच्या वर्क ऑर्डर काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता, दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात लाचेची मागणी झाल्याचे समजते. तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती.

बुधवारी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे (वय ५६), सुनील पाटील (वय ५८), गणेश पाटील (वय ५०), अतुल पाटील (वय ३७), आणि योगेश पाटील (वय ३७) यांना ताब्यात घेण्यात आले. पारोळा पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here