लोणवाडी येथे 25 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क| ३० ऑगस्ट २०२४

 

जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथे गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दीड वाजता २५ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव महेंद्र नारायण पाटील (वय २५) असे आहे.
महेंद्र पाटील हा आपल्या मित्रांसोबत गावातील शेतात असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो सुमारे ७० फुट खोल असलेल्या विहिरीत बुडाला. मित्रांनी आरडाओरड करून मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ प्रदीप पाटील आणि पोहेकॉ स्वप्नील पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने महेंद्रचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर महेंद्रला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर लोणवाडी गावात शोककळा पसरली आहे, आणि महेंद्रच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here