जळगाव:
आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला ‘अक्षय्य तृतीया’ हा सण आणि समतेचा संदेश देणारे युगपुरुष ‘महात्मा बसवेश्वर’ यांची जयंती असा दुहेरी योग जुळून आला आहे. या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात मांगल्याचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अक्षय्य तृतीया: सुख-समृद्धीचा सण
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज सकाळपासूनच नागरिकांनी दानधर्म आणि पूजेला सुरुवात केली आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीने कुंभाचे पूजन करून पूर्वजांचे स्मरण केले जात आहे. नवीन वस्तूंची खरेदी, सुवर्णखरेदी आणि नवीन कामांचा शुभारंभ करण्यासाठी आज बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. “या दिवशी केलेले दान आणि पुण्य अक्षय्य राहते,” अशी धारणा असल्याने ठिकठिकाणी माठ आणि थंड पाण्याचे वाटपही केले जात आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती: ‘कायकावे कैलास’चा जयघोष
दुसरीकडे, ‘कौयकावे कैलास’ (कष्ट हाच कैलास) असा विचार देणारे क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जळगाव शहरातील विविध भागात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज आणि सामाजिक समतेचा संदेश यावर विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. वीरशैव लिंगायत समाजासह सर्वधर्मीयांकडून या निमित्ताने अभिवादन केले जात आहे.
ठिकठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव
आजच्या या शुभ दिनानिमित्त राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय्य तृतीयेच्या गोडव्याने आणि बसवेश्वरांच्या विचाराने सर्वांचे जीवन समृद्ध व्हावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
शुभेच्छुक:
संपादक, जळगाव समाचार न्यूज

![]()



