ठाण्यात फुटबॉल मैदानावरील टीन शेड कोसळले, 6 जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक…

 

ठाणे, जळगाव समाचार डेस्क;

ठाण्यात (Thane) शुक्रवारी रात्री उशिरा सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे (Rain) फुटबॉल (Football) मैदानावरील टिनचे शेड कोसळले. हा अपघात झाला तेव्हा जवळपास 17 मुले मैदानावर फुटबॉल खेळत होती. या अपघातात सहा मुले जखमी झाली आहेत. जखमी मुलांना उपचारासाठी जवळच्या बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (टीएमसी) अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आमदारांनी जखमी मुलांची भेट घेतली
दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक जखमी मुलांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. तेथे 17 ते 18 मुले फुटबॉल खेळण्यासाठी गेली होती, असे त्यांनी सांगितले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दुस-या सोसायटीचे टिनचे शेड जमिनीवर पडले. तर सात मुले जखमी झाली आहेत. चार मुलांची प्रकृती ठीक आहे तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सीएम शिंदे यांना अपघाताची माहिती दिली
या अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कोणत्याही कुटुंबाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व मुलांवर उपचार सुरू आहेत. सर्वांच्या उपचाराची जबाबदारी आम्ही घेणार असल्याचेही आम्ही डॉक्टर आणि प्रशासनाला सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here