जम्मू-काश्मीर लवकरच राज्य म्हणून काम करेल – पंतप्रधान मोदी

 

जम्मू , जळगाव समाचार डेस्क;

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)गुरुवार आणि शुक्रवारी केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) दौऱ्यावर आहेत. गुरुवारी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी एक मोठे वक्तव्य केले आहे. जम्मू-काश्मीर लवकरच राज्य म्हणून काम करेल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. पीएम मोदी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
370 ची भिंत आता पडली – पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यापासून जम्मू-काश्मीरमधील मुली आणि दुर्बल घटकातील लोक त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. सबका साथ, सबका विकास या मंत्राला अनुसरून आमच्या सरकारने प्रत्येकाला हक्क आणि संधी दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये येणारा हा बदल गेल्या 10 वर्षातील आमच्या सरकारच्या प्रयत्नांचे परिणाम असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पीएम मोदी म्हणाले की, आज जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संविधान खऱ्या अर्थाने लागू झाले आहे कारण कलम 370 ची भिंत आता पडली आहे ज्याने सर्वांना विभाजित केले आहे.
84 विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
पंतप्रधान मोदींनी 1,800 कोटी रुपयांचे कृषी आणि संलग्न क्षेत्रातील प्रकल्पही लॉन्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये 1,500 कोटी रुपयांच्या 84 विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी 2000 हून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.
दहशतवाद्यांनाही इशारा
जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांचाही उल्लेख केला. शत्रूंना धडा शिकवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांकडे बोट दाखवत पीएम मोदी म्हणाले की, शांतता आणि मानवतेच्या शत्रूंना जम्मू-काश्मीरची प्रगती आवडत नाही आणि आज ते येथील विकास थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here