जळगाव समाचार | ३० नोव्हेंबर २०२५
जळगावातील एका तरुणाने संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे मराठी ‘मिरर इमेज’ प्रकारात लेखन करून वेगळ्या पद्धतीने जनजागृती केली. संविधानाचं पहिलं पान असलेली उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा पाया व आत्मा मानली जाते. संविधानातील नैतिक तत्त्वे, मूलभूत उद्दिष्टे आणि विविध कलमांचा अर्थ समजून घेण्यासाठी उद्देशपत्रिका दिशादर्शक भूमिका बजावते. याच आत्म्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना संविधानाचा गाभा समजावा, या हेतूने हर्षल सोनार यांनी हे अनोखे सादरीकरण केल्याचे सांगितले.
मिरर इमेज शैलीत अक्षरांची मांडणी पूर्णपणे उलटी करावी लागते. आरशात परावर्तित झाल्यावरच ही अक्षरे स्पष्ट वाचता येतात. “काही जण संविधानविरोधी विचार मांडतात; अशांना उलट्या अक्षरांमधूनही संविधानाचा आत्मा वाचता यावा, म्हणून मिरर इमेज प्रस्तावना लिहिली,” असे सोनार यांनी नमूद केले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

![]()




