चाळीसगावातून १० लाखाच्या गांजासह आरोपीला अटक…

 

जळगाव समाचार डेस्क;

चाळीसगाव शहरातून तब्बल १० लाख रुपये किमतीचा ५० किलो गांजासह एका ५४ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैधरीत्या गुन्हे करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिक्षक कॉलनीत राहणारा अशोक भरतसिंग पाटील (५४) हा आरोपी अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने संबंधित आरोपीवर छापा टाकून संशयित अशोक पाटील याच्याकडून १० लाख ६३०० रुपयांचा ५० किलो ३१५ ग्रॅम गांजा मिळून आला. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २२ लाख ६ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित अशोक पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर (पवार), सहा पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील, निवासी नायब तससिलदार जितेंद्र धनराळे, पोउनि सुहास आव्हाड, पोहेकॉ सुभाष घोडेस्वार, राहुल सोनवणे, विनोद भोई, पोना महेंद्र पाटील, पोकॉआशुतोष सोनवणे, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर गिते, मनोज चव्हाण, राकेश महाजन, रविंद्र बच्छे, स्नेहल मांडोळे, अनिकेत जाधव, प्रविण वाणी यांचे पथकाने हि कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here