जळगाव समाचार | २७ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीतील अनियमिततेवरून निवडणूक आयोगालाच थेट आव्हान दिल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची संघटनात्मक बैठक पार पडली. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनिती, मतदार यादीतील बोगस नावे शोधण्याची जबाबदारी आणि संघटनाची पुनर्रचना यावर सविस्तर चर्चा झाली.
माजी आमदार ॲड. बाविस्कर यांनी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मतदार यादीचे बारकाईने परीक्षण करण्याचे निर्देश दिले. “दुबार नावे, अनियमितता आणि संशयास्पद नोंदी आढळल्यास तत्काळ जिल्हास्तरावर अहवाल सादर करा,” अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, रिक्त पदांची पुनर्नियुक्ती करून योग्य व्यक्ती योग्य जबाबदारीवर असावी, यासाठी जिल्हाध्यक्षांना अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अनिल वाघ, मुकुंदा रोटे आणि कमलाकर घारू यांनी आपापल्या विभागातील संघटन आणि निवडणूक तयारीचा आढावा सादर केला.
या बैठकीत पुढील निवडणुकांमध्ये मनसेची ताकद दाखविण्यासाठी प्रभाग आणि तालुका पातळीवर स्वतंत्र बैठका घेण्याचा, जनसंपर्क मोहीम राबविण्याचा आणि युवकांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपजिल्हाप्रमुख संजय नन्नवरे, महानगर प्रमुख विनोद शिंदे, जामनेर तालुका प्रमुख अशोक पाटील, भुसावळ शहर प्रमुख राहुल सोनटक्के, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेंद्र लिंगायत, श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, संदीप फुलझाडे, जितेंद्र बऱ्हाटे, रज्जाक सय्यद, अविनाश पाटील, योगेश पाटील, कल्पेश पवार, ऐश्वर्य श्रीरामे, ॲड. सागर शिंपी, मंगेश भावे, भूषण तळेराव, समाधान माळी, रामकृष्ण पवार, कन्हैया पाटील, सतीश सैंदाणे, गणेश कुंभार, अमोल माळी, विनोद पाटील, हर्षल वाणी, संदीप मांडोळे, प्रदीप पाटील, शैलेश चौधरी, भूषण ठाकरे, राहुल चव्हाण, दिनेश मराठे, पवन कोळी, महेश सुतार, चेतन नैरानी, कृष्णा धुंदुले, अरुण गव्हाणे, भूषण पाटील, भैय्या लिंगायत, प्रतीक सोनवणे, प्रतीक भंगाळे, प्रणय भागवत, वैभव सुरवाडे, दीपक सोनवणे, दशरथ सपकाळे, तुषार वाढे, अभिषेक बोरसे, रवी कोळी, करण गंगतीरे, सागर पाटील, विशाल कोळी, शुभम पाटील, वाल्मीक जगताप, सुनील माळी, तसेच महिला सेनेच्या अनिता कापुरे आणि लक्ष्मी भील उपस्थित होत्या.

![]()




