कॉल सेंटर प्रकरणात माजी महापौरांना कोठडीत व्हीआयपी सुविधा; तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली…

 

जळगाव समाचार | ७ ऑक्टोबर २०२५

मुमराबाद रस्त्यावर सुरू असलेल्या विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणानंतर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी रात्री या संदर्भातील आदेश जारी केले असून, या बदलीला बोगस कॉल सेंटर प्रकरणाशी जोडले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध देशांतील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. हे केंद्र तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असताना, प्रभारी अधिकाऱ्यांना त्याची माहिती नसल्याचे समोर आले. याशिवाय, या प्रकरणात अटक केलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांना पोलिस कोठडीत व्हीआयपी सुविधा दिल्याचा आरोपही झाला होता.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत निरीक्षक संजय गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदाचा तात्पुरता कार्यभार सहाय्यक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या बदलामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेत मोठी चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here