मू. जे. महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन; योग व आरोग्य प्रशिक्षणावर भर

 

जळगाव समाचार | १३ सप्टेंबर २०२५

के. सी. ई. सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी युवती सभेचे उद्घाटन संपन्न झाले. विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि समस्या लक्षात घेऊन आयोजित या कार्यक्रमात योग व ध्यान प्रशिक्षणाचा विशेष समावेश करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्य डॉ. सुरेखा पालवे अध्यक्षस्थानी, युवती सभेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नाली वाघुळदे, तसेच योग मार्गदर्शक म्हणून डॉ. देवानंद सोनार व डॉ. ज्योती वाघ उपस्थित होते.

युवती सभेच्या उपक्रमांचा आढावा डॉ. वाघुळदे यांनी सादर केला. उद्घाटनप्रसंगी डॉ. फडणवीस यांनी शिक्षणासोबत योग व आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थिनींना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुरेखा पालवे यांनी शिक्षणासोबत स्त्री-सशक्तीकरणाचा संदेश दिला. त्यानंतर योग मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना योग व ध्यानाचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नीलम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. देवेश्री सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. हेमलता पाटील, डॉ. योगिनी राजपूत, डॉ. कविता पाटील, डॉ. नयना पाटील, प्रा. सोनाली शर्मा, डॉ. प्रतिभा तिवारी आणि हरीश चौधरी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here