जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर ८६ उमेदवारांची नियुक्ती

 

जळगाव समाचार | १३ सप्टेंबर २०२५

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत गट ‘ड’ संवर्गातील परिचर पदावर अनुकंपा तत्त्वावर ८६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. वर्षभरानंतर पार पडलेल्या या भरती प्रक्रियेमुळे उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. समुपदेशन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत पारदर्शक व सुबक पद्धतीने राबविण्यात आले.

समुपदेशन प्रक्रियेला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, उपयुक्त जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रदीप झोड, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांसह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here