ईद मिलादुन्नबी निमित्त नात व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

0
10

 

जळगाव समाचार | ११ सप्टेंबर २०२५

शहरातील पिंप्राळा हुडको येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक १९ मध्ये ईद मिलादुन्नबी (स.अ.व.) मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी नात वाचन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपली नाती आणि भाषणे सादर केली.

कार्यक्रमाची सुरुवात कुरआन शरीफच्या तिलावतने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमजदभाई रंगरेज होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्या चरित्राविषयी, त्यांच्या नैतिक मूल्यांविषयी आणि शिक्षणाविषयी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा, प्रेम आणि नैतिक मूल्ये निर्माण करणे हा असून त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडावे तसेच समाजात सकारात्मक योगदान देता यावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी शिक्षकांनीही मार्गदर्शन करताना पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांचे शिक्षण हे मानवतेसाठी आदर्श असून त्यांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांच्या यश, आरोग्य आणि समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षक अबजल सर, शगुफ्ता मॅडम, शाकीप सर, नाजिम सर, फरान सर, वसिम सर यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here