जळगाव समाचार | ६ सप्टेंबर २०२५
अनंत चतुर्दशी निमित्त ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जळगाव शहरासह तालुक्यात शनिवारी भरविले जाणारे सर्व आठवडे बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शनिवारी आठवडे बाजार भरतात. मात्र, त्याच दिवशी विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात होत असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, रद्द करण्यात आलेले आठवडे बाजार संबंधित ठिकाणी सोयीच्या दुसऱ्या दिवशी भरविण्याची परवानगी देण्यात आली आहे.