जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२५
जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत शंकरराव काळुंखे (वय ७१) यांचे दिनांक ३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून २४ मिनिटांनी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता खेडी शिवार, पत्रकार कॉलनी येथील राहत्या घरून नेरी नाका स्मशानभूमीकडे निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते रेशन दुकानदार हेमरत्न (चिकूभाऊ) व मकरंद काळुंखे यांचे वडील होत.

![]()




