जळगाव समाचार | ३ सप्टेंबर २०२५
गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सुभाष पाटील यांच्या मातोश्री गोदावरी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. आज बुधवार दुपारी १.३४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने गोदावरी परिवारासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
गोदावरी पाटील या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावासाठी परिचित होत्या. त्यांच्या संस्कारांनी डॉ. उल्हास पाटील यांना जीवनात प्रेरणा मिळाली. कुटुंब व समाजासाठी त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांचे कार्य स्मरणात राहील, अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
त्यांचे पार्थिव आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत अंतिम दर्शनासाठी गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केट, जळगाव येथे ठेवण्यात येणार आहे. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.