जळगाव समाचार | दि. ३ सप्टेंबर २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने नवा आदेश जारी करत महानगरपालिकेतील प्रभागांची नवी रचना आणि सदस्यसंख्या निश्चित केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५(३) अंतर्गत काढलेल्या या अधिसूचनेनुसार, आता जळगाव महापालिकेत एकूण ७५ सदस्यांची निवड होणार आहे.
निश्चित करण्यात आलेल्या प्रभागरचनेनुसार –
• चार सदस्यीय प्रभाग : १८
• तीन सदस्यीय प्रभाग : ०१
• पाच सदस्यीय प्रभाग : ००
• एकूण प्रभाग : १९
• एकूण सदस्यसंख्या : ७५
यामुळे यापूर्वीच्या तुलनेत महापालिकेतील सदस्यसंख्या वाढली असून, राजकीय समीकरणांमध्येही नवे बदल होण्याची शक्यता आहे.
या अधिसूचनेचा प्रारूप मसुदा लवकरच राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. नागरिकांनी आपली हरकती अथवा सूचना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात महापालिका आयुक्तांकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही हरकती किंवा सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
प्रभाग व सदस्यसंख्येचा अंतिम निर्णय राज्य शासन अथवा त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मान्यतेने आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे शहरातील नागरिक, राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवारांचे विशेष लक्ष लागले आहे.
राज्य शासनाच्या या अधिसूचनेनंतर जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. ७५ सदस्यांची नवी महापालिका जळगावच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण करणार असून, यामुळे शहरात राजकीय चर्चांना वेग आला आहे.
शासन आदेश
https://www.jcmc.gov.in/election-ward-formation-draft-2025-26.htm#