जळगाव समाचार | २ सप्टेंबर २०२५
नशिराबाद टोल नाक्याजवळ असलेल्या मुकेरीया ढाब्याचे मालक बाबा सेठ यांचे सुपुत्र सूर्यप्रताप सिंग मुकेरीया हे दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी “मंदिरात जातो” असे सांगून घरून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते आजतागायत परतलेले नाहीत. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांची चांगलीच चिंता वाढली आहे.
सदर मुलगा बेपत्ता झाल्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू असूनही अद्याप काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. सूर्यप्रताप सिंग यांना कुणी पाहिले असल्यास किंवा त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास तातडीने खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.
संपर्क पत्ता व क्रमांक :
मुकेरीया ढाबा,
बाबा सेठ,
नशिराबाद, मुंबई-नागपूर हायवे,
टोल नाका जवळ
7796790457 / 7875270111