जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५
ब्रिटिश सरकारने १८७१ साली लागू केलेल्या Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या समाजबांधवांवर स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अन्याय व अत्याचार झाले. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून वंचित राहिल्याने त्याचे दिर्घकालीन सामाजिक परिणाम जाणवले. अखेर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा कायदा रद्द करण्यात आला व या जातींना ‘विमुक्त’ म्हणून मान्यता मिळाली.
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि भटके विमुक्त समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्रउभारणातील योगदानाचा गौरव करण्यासाठी ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता के.सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज, नॅशनल हायवे ६, आय.एम.आर. कॉलेजजवळ, जळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव यांनी केले आहे.