जळगाव समाचार | २८ ऑगस्ट २०२५
जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध संवर्गातील एकूण 207 कर्मचारी यांना गेल्या पाच महिन्यांत पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी मार्च 2025 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.
या पदोन्नतीसाठी समुपदेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. सर्व बैठकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य ठेवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही प्रक्रिया एक अभिनव पाऊल मानली जात आहे.
विभागनिहाय पदोन्नती :
• बांधकाम विभाग – 11
• ग्रामपंचायत विभाग – 11
• कृषी विभाग – 5
• आरोग्य विभाग – 63
• पशुसंवर्धन विभाग – 7
• अर्थ विभाग – 14
• सामान्य प्रशासन विभाग – 3
• शिक्षण विभाग – 93
पदोन्नती मिळालेल्या पदांमध्ये सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, ग्रेडेड मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी आदींचा समावेश आहे.
विशेष वैशिष्ट्ये :
• प्रथमच अल्पावधीत मोठ्या प्रमाणात पदोन्नती
• समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचार्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत
• प्रत्येक टप्प्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे पारदर्शकता
• कर्मचारीवर्गामध्ये समाधान व प्रोत्साहनाची भावना निर्माण
या प्रक्रियेने जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, कर्मचारीवर्गाचा मनोबल उंचावणे आणि स्थिरता निर्माण करणे यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.