जळगाव समाचार | २५ ऑगस्ट २०२५
शहरातील किशोर सूर्यवंशी यांनी जर्मनी येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 5000 मीटर चालण्याच्या स्पर्धेत त्यांनी दमदार प्रदर्शन करीत रौप्य पदक पटकावले. या कामगिरीमुळे जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात गौरवाने उजळले आहे.
कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर किशोर सूर्यवंशी यांनी जागतिक स्पर्धेत आपले वेगळेपण दाखवले. भारतासाठी रौप्यपदक जिंकत त्यांनी केवळ जळगाव जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे जळगावच्या क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
किशोर सूर्यवंशी यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, स्थानिक क्रीडाप्रेमी, नागरिक व सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.