जळगाव समाचार | ५ जून २०२५
चर्चगेट रेल्वे स्टेशनमधील कॅन्टिनमध्ये आज गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत स्टेशनमध्ये धुराचे लोट पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग स्टेशनवरील केकच्या दुकानात लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. अधिक तपास सुरू आहे.