शहरातील कांचन नगरात चार महिन्यांचे अर्भक आढळल्याने खळबळ; अज्ञात आईविरोधात गुन्हा दाखल…


जळगाव समाचार | ४ जून २०२५

जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन ते चार महिन्यांच्या एका अर्भकाचा मृतदेह सापडला आहे. हे बाळ बेशुद्ध अवस्थेत सोडून दिल्याची आणि आईने तिथून पळ काढल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना शहरातील कांचननगर परिसरातील चौगुले प्लॉट भागात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

अर्भकाचा मृत्यू कसा झाला, आणि त्याला तिथे कुणी आणून टाकले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here