मुक्ताईनगरजवळ बस-ट्रकच्या भीषण अपघातात २ जण ठार, २० जखमी…

 

जळगाव समाचार | ४ जून २०२५

मुक्ताईनगर शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत.

सिहोरी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस सुरतहून मेहकर (जि. बुलडाणा) कडे जात होती. पहाटे सुमारे चारच्या सुमारास कोथळी गावाजवळील हायवे उड्डाण पुलावर या बसची समोरून येणाऱ्या ट्रकसोबत जोरदार धडक झाली.

या धडकेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शेवटच्या वृत्तानुसार मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेची नोंद मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here