महाराष्ट्रात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना सुरुवात; जिल्हापेठचे निरीक्षक मानगावकर यांची मुंबईत बदली…

 

जळगाव समाचार | २८ मे २०२५

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून मंगळवारी २४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जाहीर केले. या बदल्यांमध्ये काही निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली असून काही बदल्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

या बदल्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांची बदली मुंबई शहर विभागात करण्यात आली आहे. तर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी तपासणी समितीचे निरीक्षक सागर शिंपी यांची नियुक्ती जळगाव येथे झाली आहे.

दरम्यान, भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग विठ्ठल पवार यांची पदोन्नती होणार असल्यामुळे त्यांची बदली तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

या प्रशासकीय फेरबदलांमुळे राज्य पोलीस दलात अंतर्गत बदल घडून येत असून, एकूण २१५ पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पदांवर पदोन्नती दिली जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांसह कार्यरत अधिकाऱ्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here