जळगावात भीषण अपघातात २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू…

 

जळगाव समाचार | २७ मे २०२५

शहरातील इच्छादेवी चौकात सोमवारी (२७ मे) पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघातात २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव प्रेम धीरज ठाकूर (रा. शिंदे नगर) असे असून, अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत त्याचा मृत्यू झाला.

प्रेम ठाकूर हा टूर अँड ट्रॅव्हल्स व्यवसायात कार्यरत होता आणि आपल्या कुटुंबाचा आधार होता. सोमवारी पहाटे दुचाकीवरून जात असताना इच्छादेवी चौकात समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की प्रेमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अकस्मात मृत्यूची नोंद केली.

प्रेमच्या मृत्यूने शिंदे नगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here