जळगाव समाचार | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीचा निकाल अखेर मंगळवारी (१३ मे) जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९४.१०% लागला असून, कोकण विभागाने ९८.८२% निकालासह पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे.
यावर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली असून, त्यांचा उत्तीर्णतेचा टक्का ९६.१४% आहे, तर मुलांचा टक्का ९२.३१% आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ३.८३% अधिक आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
• https://results.digilocker.gov.in
• https://sscresult.mahahsscboard.in
• http://sscresult.mkcl.org
• https://results.targetpublications.org
विद्यार्थ्यांना आपला निकाल दुपारी १ वाजता पासून वरील संकेतस्थळांवर पाहता येईल.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १.७१% घट झाली आहे.
• २०२४ : ९५.८१%
• २०२३ : ९३.८३%
• २०२२ : ९६.९४%
• २०२१ : ९९.९५%
• २०२० : ९५.३%
यंदा राज्यभरातून एकूण १६.११ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामध्ये
८.६ लाख मुलं, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान घेण्यात आली होती.