खेडी परिसरातील वेश्या व्यवसायावर शनिपेठ पोलिसांचा छापा; दांपत्यासह पाच जण ताब्यात…


जळगाव समाचार | ९ मे २०२५

जळगाव शहरातील खेडी परिसरात एका कॉलेजजवळ चालविल्या जात असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये दोन गिऱ्हाईक, व्यवसाय चालवणारे दांपत्य आणि एक महिला संशयित यांचा समावेश आहे.

शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना या ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईची योजना आखली. स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकरणाची तक्रार केली होती. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकला.

या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे आणि काजल सोनवणे सहभागी होते.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here